किशोर जाधव जळगाव। रेल्वे खाते केंद्र शासनाच्या अंतर्गत असल्याने रेल्वे प्रशासनाचे सर्व कामकाज केंद्र शासनामार्फत चालते. रेल्वेची मालमत्ता व भांडवल हे शासनाचेच असते. रेल्वेवर उदरनिर्वाह करुन पोट भरणार्यांची संख्या ही मोठी आहे. रेल्वेला अनाथाचे आश्रय देखील म्हटले जाते. रेल्वेची मालमत्ता शासकीय असल्याचे कोणतीही खाजगी व्यक्ती याचा सार्वजनिक वापर करु शकत नाही. मात्र जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रशासनाच्या मालमत्तेचा सर्रासपणे सार्वजनिक वापर होतांना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. खानदेश हा वनसंपदेने नटलेला प्रदेश आहे.
लिंबाच्या काड्या भिजवितात पाण्यात
खान्देशात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. त्यापैकी एक म्हणजे लिंब. रेल्वेने दोन-चार दिवस सतत प्रवास करणार्यांची संख्या मोठी असते. लिंबाच्या काड्यांचा दातूनला रेल्वे प्रवाशांकडुन मोठी मागणी असते. थेट मुंबईपर्यत जळगाव जिल्ह्यातील दातुन विक्रीला जात असते. दातुन विक्री करणारे विक्रेते लिंबाच्या झाडाची फादी तोडुन रेल्वे स्थानकावर आणतात ही काडी मुंबई पर्यत घेऊन जायची असल्याची ती वाळायला नको म्हणून लिंबाच्या काड्याला पाण्यात भिजवने आवश्यक असते. प्रवाशांसाठी फलाटावर पाण्याची व्यवस्था केलेली असते त्या पाण्याने विक्रेत लिंबाच्या काड्या काड्या भिजवतात. अन्य प्रवाशांच्या जीविताची परवा न करता विक्रेते फलाटावर मनमानी कारभार करतात.
प्रवाशांच्या जीवाला धोका
रेल्वे फलाटावर उपलब्ध रेल्वे प्रशासनाच्या मालमत्तेचे खाजगी वापर होतांना दिसत आहे. लिंबाच्या काड्या भिवतांना मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते. काडी भिजवतांना हे पाणी फलाटावर पसरत जाते. एखाद्या वेळेस प्रवासी घाईत असेल आणि चुकीने जर पाण्यावर पाय पडला तर अपघात होऊ शकतो. तसेच ज्या ठिकाणी प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याठिकाणी लिंबाचे पाले भिजवले जात असल्याने अस्वच्छता पसरुन प्रवाशांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. प्रवाशांच्या जिवीतेचे व आरोग्याचे भान ठेवुन किमान रेल्वे सुरक्षा दलाने हे प्रकार रोखले पाहिजे.