रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी आठ विशेष गाड्या

0

भुसावळ । रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून साप्ताहिक विशेष गाड्या प्रवाशांच्या सेवेकरीता सुरु करण्यात आल्या आहे.
यामध्ये गाडी क्रमांक 02107/02108 ही वातानुकुलीत साप्ताहिक गाडी असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ पर्यंत जाईल. 02125 नागपूर-अमृतसर, 02822 संत्रागची-पुणे एक्स्प्रेस 4 फेब्रुवारी तेे 24 जूनदरम्यान प्रत्येक शनिवारी धावेल. गाडी क्रमांक 01041 ही छत्रपती शिवाजी टर्मिनसहून नागपूरला 28 जानेवारी रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक 01005 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव ही गाडी 25 जानेवारी रोजी धावेल. गाडी क्रमांक 01084 मडगाव-नागपूर ही गाडी 26 जानेवारी रोजी एकच फेरी धावणार आहे. गाडी क्रमांक 01018 नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी केवळ 27 जानेवारी रोजी धावेल. गाडी क्रमांक 01013 लोकमान्य टिळक टर्मिनस-करमोली (कोकण रेल्वे) ही गाडी 29 जानेवारी रोजी केवळ एका फेरीपुरती धावणार आहे. याचा प्रवाशांना लाभ होईल.