नाताळात प्रवाशांची गैरसोय दूर होणार
भुसावळ: रेल्वे गाड्यांना प्रवाशांची असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून सहा हॉलिडे स्पेशल सुपरफास्ट गाड्या सुरू करण्यात येत आहे. यामुळे नाताळाच्या काळातही प्रवाशांची जागेसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. अप-डाऊन मार्गावरील सहा गाड्या सुरू करण्यात येत आहे. यात मुंबई-कानपूर,झॉशी -पुणे आणि नागपूर – राजकोट या मार्गावर नवीन गाड्या धावणार आहे. सहाही गाड्या या भुसावळ विभागातून धावणार असल्याने या भागातील प्रवाशांची सुध्दा साोय होणार आहे.
मध्ये रेल्वेप्रशासनाकडून सुरू करण्यात येत असलेल्या हॉलिडे स्पेशल सुपरफास्ट गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून (04152) ही गाडी दर रविवारी दुपारी 4.40 वाजता मुंबई येथून सुटून कानपूर सेट्रलला रात्री 8.30 वाजता पोचणार आहे. ही गाडी 8 डिसेंबर 2019 ते 12 जानेवारी 2020 पर्यत चालविली जाणार आहे. तर कानपूर सेट्रल येथून दर शनिवारी दुपारी एकला ही गाडी (04151) मुंबईसाठी सुटणार आहे. ही गाडी 7 डिसेंबर 19 ते 11 जानेवारी 20 पर्यत चालविली जाणार आहे. या गाडीला कल्याण, ईगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, शंकरगड, अलाहाबाद आणि फत्तेहपूर येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच पुणे येथून दर गुरूवारी दुपारी 3.15 वाजता पुणे झॉशी ही गाडी सुटणार असून ही गाडी 2 ते 16 जानेवारी या काळात चालविली जाणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी झॉशी येथून दर बुधवारी सकाळी 10.20 सुटणार आहे. 1 ते 15 जानेवारी या काळात ही गाडी चालविली जाणार आहे. नगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, विदिशा, गंजबसोदा, बीना, ललितपूरआणि बबीना येथे थांबणार आहे.
नागपूर-राजकोट एक्स्प्रेस
नागपूर राजकोट सुपरफास्ट ही गाडी (02107) दर सोमवारी नागपूर येथून सायंकाळी 7.50 वाजता सुटणार आहे. राजकोटला दुसर्या दिवशी दुपारी 4.30 वाजता पोचेल.ही गाडी 23 डिसेंबर ते 6 जानेवारी 20 या काळात चालविली जाणार आहे. परतीच्या प्रवासात (02108) ही गाडी राजकोट येथून दर मंगळवारी रात्री 10 वाजता ही गाडी नागपूरसाठी रवाना होणार आहे. ही गाडी 24 डिसेंबर ते 7 जानेवारी 20 या काळात चालविली जाणार आहे. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, सूरत, भरूच, आनंद, अहमदाबाद, विरमगाव आणि सुरेद्रनगर येथे थांबा दिलेला आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवान रेल्वेच्या वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.