रेल्वे प्रश्नाबाबत ना. रावल यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

0

दोंडाईचा। धुळे जिल्ह्यातील रेल्वे विषयक प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून अनेक मागण्या त्यांच्याकडे केल्या. राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल हे दिल्ली दौर्‍यावर असून त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.

त्यांच्या समवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी धुळे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली तसेच अनेक मागण्याही त्यांच्याकडे
केल्या.

अमृतसर-सीएसटी एक्सप्रेसला एसी डबा जोडा
त्यात भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर नवीन गाडी ’साने गुरुजी एक्सप्रेस’ सुरु करण्यात यावी, अमृतसर- सीएसटी एक्सप्रेसला धुळ्यासाठी टु टायर वातानुकूलित डबा जोडण्यात यावा, डेक्कन ओडीसी या विशेष गाडीत काय सुधारणा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या वाढीसाठी महाराजा एक्सप्रेसच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी गाडी सुरू करता येईल का.? याबाबत ही चर्चा करण्यात आली. शिवाय मनमाड- इंदौर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांचे ना. रावल यांनी आभार व्यक्त केले.