रेल्वे बजेटमध्ये भुसावळ विभागाच्या वाट्याला 478 कोटीचा निधी

0
भुसावळ : – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील विकासकामांना चालना देण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 478 कोटी तर अतिरीक्त कामांसाठी 268 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे, तर तिसरी व चौर्थीमार्ग , मनमाड-ईगतपुरी तिसर्‍या मार्गासाठी निधी मिळाला आहे. विभागात विकास कामांना मोठ्या प्रमाणावर  निधी मिळाला आहे. अशी माहिती डीआरएम आर.के. यादव यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
सादर करण्यात आलेल्या अर्थ संकल्पातच रेल्वे बजेटही सादर केला होता. भुसावळ विभागाच्या वाट्याला काय निधी मिळतो याबाबत उत्सुकता होती. मात्र रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती मंगळवारी येथील डीआरएम कार्यालयास प्राप्त झाल्यामुळे मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ मंडळ अभियंता (समन्वयक) विनोद भंगाळे उपस्थित होते.
डीआरएम यादव म्हणाले की, भुसावळ विभागातील विकास कामांना रेल्वे बजेट मध्ये चांगला निधी प्राप्त झाला आहे. त्या निधीवरच विभागातील विकास कामांना चालना मिळणार आहे. विकास कामांना गती दिली जाणार आहे. यात तिसरी लाईन, चौर्थी लाईन, विभागातील 16 रेल्वे स्थानकांवर पादचारी पूलाचे काम,रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीसाठी, सिग्नल यंत्रणेच्या अद्यावतीकरण करणे, वर्कशॉपच्या कामासाठी, विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर 14 नवीन अ‍ॅक्सीलेटर मंजूर करण्यात आले आहे.तसेच भुसावळ-जळगाव तिसर्‍या व चौर्थ्या लाईनीसाठी विशेष निधी प्राप्त झाला आहे, मार्च अखेरपर्यत पहिल्या टप्यात भादलीपर्यत लाईन टाकण्याचे काम पूर्ण करायचे असल्याचे डीआरएम यादव यांनी सांगितले.  यावेळी विभागात सुरू असलेल्या विकास कामांबाबत त्यांनी माहिती दिली.  विभागात सुरू असलेल्या विकास कामांना या निधीच्या माध्यमातून चालना दिली जाणार आहे.