भुसावळ: भुसावळ मुख्य गार्ड मास्टर कार्यालयातील गुडस् लॉबीमध्ये रेल्वे मजूर युनियनतर्फे सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. ऑन ड्युटी आणि ऑफ ड्यूटी असे दोन्ही कर्मचाऱ्यांना किटचे वाटप करण्यात आले. सेफ्टी किटमध्ये सॅनिटायझर, हँड वॉश, ग्लोजचे वाटप करण्यात आले. यावेळी रेल्वे मजूर युनियनचे मंडळ सचिव आर.आर.निकम, इ.सी.सी.सोसायटीचे डायरेक्टर रवींद्र भालेराव, ए.टी.खांबायत, प्रदीप गायकवाड, एस.बी.तळेकर, डी.बी.महाजन, सचिन महाजन, यो.अस्लम,एस.एस.वानखेडे, संजीव श्रीनाथ,एच.के.चौरसिया, अनिल मालविया,किरण नेमाडे,एच.व्ही.अडकमोल,सैय्यद सादिक,मिलिंद चौधरी, कैलास हिरे, राजेश चौधरी,डी.जी.मोरे, योगेश वाघमारे, योगेश विनंते आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. यात लोकोपायलट आणि गार्ड सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.