रेल्वे मालगाडीच्या धक्क्याने एकाच मृत्यू

0

अमळनेर । तालुक्यातील टाकरखेडा येथील रेल्वेस्थानकावर मालगाडी पास करीत असतांना मालगाडीचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 11.45 वाजेदरम्यान घडली असून अमळनेर रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टाकरखेडा येथील रेल्वे स्टेशनवरील कर्मचारी राजु गोरखनाथ पाटील (वय- 52) रा रेल्वे वसाहत टाकरखेडा हे सकाळी 11.45 दरम्यान स्थानकावर आलेली मालगाडी झेंडा दाखवून पास करीत असतांना त्यांना त्याच मालगाडीचा जोरदार धक्का दिल्याने ते दुरवर फेकेले गेल आणि त्यात त्यांच्या डोक्यास मार लागल्याने त्याचे जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचार्‍यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत अमळनेर रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रेल्वे पोहेकॉॅ मुजीम शेख हे करीत आहेत.