उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांचे महापौरांना पत्र
जळगाव: शहरातील भोईटे नगरला लागून रेल्वे मार्गावर मालधक्का आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून मालधक्क्यामुळे तेथील रहिवाशांना विविध त्रासांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मालधक्का शहराबाहेर हलविण्याची रहिवासी नागरिकांची जोरदार मागणी असून याबाबत महापालिकेेने हा विषय महासभेत मांडून त्यावर तातडीनेू निर्णय घ्यावा तसेच रेल्वे विभाग व अन्य संबंधित विभागांची पत्र व्यवहार करावा, अशी मागणी उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी महापौरांकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महापौर यांना दिले आहे.
रहिवाशांना अनेक वर्षांपासून त्रास
रेल्वे मालधक्का हा भोईटेनगर, दूध फेडरेशन वस्ती, म्हाडा कॉलनी, भिकमचंद जैन नगर, इत्यादी परीसरातील नागरीकांना अनेक वर्षापासुन त्रासदायक ठरत आहे. या मालधक्क्यावर विविध प्रकारच्या धान्याच्या पोत्यांची तसेच, खते, सिमेन्ट इत्यादीच्या गोन्यांची नेहमीच लोडींग-अनलोडींग करण्यात येत असते, यामुळे परीसरात सतत धुराळा उडत असतो, धान्य इत्यादीमुळे वारंवार चिलट्याचा परीसरात त्रास उद्भवत असतो. काही केमिकल युक्त धुराळ्यामूळे डोळ्यांचे प्रास उद्भवत असतात.
बंदी असतांनाही अवजड वाहनांची वाहतूक
त्याचबरोबर आणखी महत्वाचे म्हणजे रेल्वेतील लोड अनलोड करावयाचे धान्य, खते, सिमेन्ट इत्यादीची वाहतुक करण्यासाठी दररोज साधारणताः 500 ते 600 वा त्यापेक्षा जास्त मालगाड्या, ट्रक्स या भागातून वेगाने जा-ये करीत असतात, वाहनांचे कर्कश हॉर्न, खडखडाटाच्या आवाजाला लोक वैतागले आहेत. रहीवास परीसरातून जाणार्या या रस्त्यांवर जड वाहनांची ये-जा वाढलेली आहे. त्यामुळे अपघात घडण्याची भिती आहे. रिंगरोड वर जड वाहनांना प्रवेश बंदीचा ठराव पारीत झालेला असतानाही वाहतुक सुरु आहे. याप्रमाणे सर्व समस्यांचा विचार करुन निर्णय घ्यावा, असे उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी महापौर यांना दिलेल्या पत्रात नमूद आहे.