भुसावळ- रेल्वे हद्दीतील वेगवेगळ्या आकाराचे व चार हजार 800 रुपये किंमतीचे 24 टायबार चोरी केल्याप्रकरणी विक्रम उर्फ सागर संजय शेटे (23, बुध्दविहार, चाळीस बंगला, लिम्पस क्लब, भुसावळ) भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अटक केली. सीआयबीचे उपनिरीक्षक जितेंद्र वासनकार, सहाय्यक उपनिरीक्षक कोमलसिंह हे लिम्पस क्लब भागात गस्तीवर असताना बुद्धविहाराजवळ संशयास्पद अवस्थेत 407 वाहन (एम.एच.04 सीजी 7505) उभे असताना पथकाने चौकशी केली असता 240 किलोग्रॅम वजनाचे व चार हजार 800 रुपये किंमतीचे रेल्वेच्या मालकिचे 24 टायबारबाबत कागदपत्रांची चौकशी केली असता संबंधित चालकाकडे कुठलीही कागदपत्रे आढळली नाहीत. खोलवर चौकशी केल्यानंतर संबंधिताने रेल्वे हद्दीतील रेल्वेच्या मालकिचे साहित्य चोरल्याची कबुली दिली. याबाबत कोमल सिंह यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.