रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांची मनमानी : आरपीएफ उपनिरीक्षकाला मारहाणीचा प्रयत्न
भुसावळ शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद : दोषींवर कारवाईची मागणी
भुसावळ : कोविशील्ड लस घेतल्यानंतर सर्दी, ताप आल्यानंतर रेल्वे आरपीएफ उपनिरीक्षकाने रेल्वे दवाखाना गाठून डॉक्टरांना त्रासाबाबत माहिती दिली मात्र संतप्त डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी आरपीएफ उपनिरीक्षकाला दमदाटी करून शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना रेल्वे दवाखान्यात 10 मार्च रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी उपनिरीक्षक डॉ.विजय साहेबराव साळवे यांच्या तक्रारीनुसार डॉ.सिद्धीश कुमार यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
दोषी डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी
रेल्वे अभियोजन सेलमधील आरपीएफ उपनिरीक्षक विजय साळवे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याना सर्दी व ताप आल्याने त्यांनी रेल्वे दवाखना गाठला. पॅथालॉजीस्ट सिद्धीश कुमार यांच्याकडे ते गेले असता डॉक्टरांन साळवे यांना कोरोना झाल्याचा संशय आल्याने त्यांनी मला बाहेर काढले तसेच हिंदीतून अश्लील भाषेत शिवीगाळ केली वॉश बेसीनजवळील रॉड काढून मारण्यासाठी धावल्याने साळवे यांनी मोबाईलमध्ये शुटींग केल्याने डॉक्टरांनी रॉड लपवला, असे साळवे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.श्रवण मंडवी यांना याबाबत कल्पना देण्यात आली तसेच वरीष्ठांना कल्पना देण्यात आल्यानंतर शहर पोलिसात या प्रकरणी तक्रार देण्यात आल्यानंतर संबंधित डॉक्टरांविरुद्ध शहर पोलिसात भादंवि 504 व 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.