पाचोरा । नवविवाहित महिलेचा मृतदेह पाचोरा-परधाडे रेल्वेच्या अप लाईनवर आढळून आल्याची घटना आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारनंतर पाचोरा ते परधाडे दरम्यान रेल्वे मार्गावर परधाडे गेट नं.133 जवळ महिलेचे प्रेत अप लाईनवर आढळून आल. चैताली सुजय लांडगे (वय 25 वर्षे रा. लक्ष्मीनगर ढेकूरोड अमळनेर) ही महिला जळगाव कोषागार कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून तिचे माहेर गिरड ता.भडगाव ह.मु. जळगाव ह्या महिलेचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झालेला असताना सदर नवविवाहितेचा मृतदेह रेल्वे लाईनवर कसा? याबद्दल माहेरच्या मंडळींकडून शंका उपस्थित केली जात आहे.
सदर महिलेच्या जवळ मी माझे जिवन संपवत असून मला माफ करा अश्या आशयाची चिठ्ठी आढळून आल्याने पोलिसांनी सांगितले पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या लग्ना अवघे दोन महिने झाले असून तीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मुलीच्या नातेवाईकांकडू सांगितले आहे.