भुसावळ विभागातील प्रवाशांची होणार गैरसोय : अन्य गाड्यांना वाढणार गर्दी
भुसावळ- रेल्वे लाईनच्या दुहेरी कामामुळे (डबल लाईन) अप मार्गावरील काशी एक्स्प्रेस 14 ते 20 तर डाऊन काशी एक्स्प्रेस 16 ते 22 जुलै दरम्यान रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागातील जंघई-वाराणसी स्टेशनमधील परसीपूर, कपसेटी तसेच सेवापूरी स्थानकावर रेल्वे लाईनचे दुहेरी काम केले जात असल्याने अप-डाऊन मार्गावरील काशी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. 15018 अप गोरखपूर-एलटीटी (काशी) एक्स्प्रेस 14 ते 20 जुलै तर 15017 डाऊन एलटीटी-गोरखपूर (काशी) एक्स्प्रेस 16 ते 22 जुलै दरम्यान रद्द करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.