रेल्वे लोकोपायलट, गार्डचे 36 तासांनंतर सुटले उपोषण

0

भुसावळ। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इंजीन लोकोपायलट, सहाय्यक लोकोपायलट व गार्ड यांना कामावर असताना सामोरे जाव्या लागणार्‍या समस्या सोडविण्यासह वेतनवाढ, रेड सिग्नल पासिंग कायदा तातडीने रद्द करा आदी मागण्यांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या ड्रायव्हर गार्ड लॉबीसमोर गेल्या दोन दिवसांपासून सुरु करण्यात आले होते. मात्र डीआरएम रामकरण यादव यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे सुरु असलेल्या उपोषणाची बुधवार 28 रोजी सांगता करण्यात आली.

उपाशीपोटी काम करुन केले आंदोलन
ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन व ऑल इंडिया गार्ड कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानेे उपाशी पोटी राहून रेल्वेगाडी चालविणे आंदोलन करण्यात आले. ड्रायव्हर गार्ड यांनी उपाशी पोटी राहून काम आदोलनात सहभागी झाले होते. दिवसभरात सुमारे 250 ड्रायव्हर, गार्ड सहभागी झाले होते. दरम्यान दुसर्‍या दिवशी उपाशी पोटी राहून ड्रायव्हर आणि गार्ड यांनी रेल्वे गाडी चालविली.

आंदोलनात यांचा होता सहभाग
यावेळी आंदोलनात एस.आर. मोरे, एन.के. गुप्ता, सी.व्ही. कापडे, एस.ए. संधू, के.एम. माळी, के.जी. राज, रामदास आवटे, व्ही.के. यादव, ए.के. पंडीत, आर.टी. साळुंखे, एम.के. अग्निहोत्री, सी.एस. अग्निहोत्री, आर.के. मेहर, डी.के. त्रिपाठी, आनंद केवट, श्रीकांत सिंग, एम.एन.खताळ, सुमित मॉन, पी.सी. अंनूरागी, राजेंद्र कुमत, बी.आर. पाल, एस.एन. बोकाडे यांनी सहभाग घेतला होता.

या आहेत मागण्या
भारतीय रेल्वेतील रनिंग विभागातील ड्रायव्हर, सहायक लाकोपायलट आणि गार्ड यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात रेड सिग्नल पासिंग नियम तातडीने रद्द करा. या नियमाचा भंग झाल्यास नोकरीवरुन कमी करण्याची कारवाई केली जाते. सातव्या वेतन आयोगाने अन्य कर्मचार्‍यांना 14. 29 टक्के वेतनवाढ दिली आहे. तशी वाढ ड्रायव्हर व गार्ड यांनाही देण्यात यावी, वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात यावी, आठवड्यातून एकदा विश्रांतीसाठी पुरेसावेळ द्यावा, आदी मागण्यांसह ड्रायव्हर, गार्ड यांना पिण्यासाठी दुषीत पाणी मिळते, इगतपुरी मध्ये पाच रनिंग रुम असूनही भुसावळ विभागाच्या रनिंग रुममध्ये कोणत्याच प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही या समस्या सोडविण्यासाठी आंदोलन केल्यामुळे डिआरएम यादव यांनी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.