भुसावळ । मध्यरात्रीच्या सुमारास शंटींग करणारे डिझेल इंजिन पाचोरा स्थानकात घसरल्याने मध्यरात्री ते पहाटे पर्यंत मुंबईकडे जाणारी रेल्वेची वाहतुक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती तर डाउन मार्गावरील गाड्या सुध्दा उशिराने धावत होत्या. पहाटे चार वाजेच्या सुमारास वाहतुक सुरळीत झाली. रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा स्थानकात शंटींग करणारे एक डिझेल इंजिन शंटींग करतेवेळी 26 रोजीच्या मध्यरात्री 11.30 च्या सुमारास मुंबईकडे जाणार्या मुख्य मार्गावर येतांना रूळावरून घसरले. यामुळे भुसावळहुन मुंबईकडे जाणारी संपुर्ण वाहतुक खोळंबली होती. भुसावळहुन आलेल्या दुर्घटना सहायता गाडीसोबत असलेल्या महाबली क्रेनच्या सहाय्याने रूळावरून उतरलेली इंजिन पहाटे 4 वाजेच्या सुमारास पुन्हा रूळावर आणुन बाजुला करण्यात आले.
मुंबईकडे जाणार्या या गाड्यांना झाला विलंब
यामुळे मुंबईच्या दिशेने जाणार्या 11025 भुसावळ – पूणे व्हाया पनवेल एक्सप्रेस (4 तास 15 मि.), 12140 नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस (4 तास 45 मि.), 13201 राजेंद्रनगर लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (4 तास 28 मि.), 12618 हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम मंगला लक्षद्विप एक्सप्रेस (भुसावळात 1 तास 20 मिनिट उशिराने आलेली, 6 तास 48 मि.), 12290 नागपूर मुंबई दुरांतो एक्सप्रेस (भुसावळात 3 तास 20 उशिराने आलेली, 6 तास 35 मि.), 12321 हावडा मुंबई मेल व्हाया मुगलसराय (भुसावळात 3 तास 5 मिनिट उशिराने, 5 तास 46 मि.), 12168 वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (2 तास 29 मि.), 22847 विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (5 तास 4 मि.), 11094 वाराणसी मुंबई महानगरी एक्सप्रेस (1 तास 30 मि.), 12142 पाटलीपुत्र लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (2 तास 42 मि.), 11056 गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस (1 तास 53 मि.), 15065 गोरखपूर पनवेल एक्सप्रेस (2 तास 51 मि.)
उशिराने धावणार्या गाड्या
मुंबईहून 26 रोजीच्या रात्री निघालेल्या व 27 रोजी भुसावळकडे येणार्या डाऊन मार्गावरील गाड्या 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस राजेंद्रनगर एक्सप्रेस (1 तास 35 मि.), 12105 मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस (2 तास 7 मि.), 12137 मुंंबई फिरोजपुर पंजाब मेल (2 तास 32 मि.), 11093 मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस (53 मि.), 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस (1 तास 20 मि.), 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्सप्रेस (1 तास 24 मि.), 11015 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस (1 तास 27 मि.), 12167 लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी एक्सप्रेस (1 तास 14 मि.), 12322 मुंबई हावडा मेल व्हाया मुगलसराय (1 तास 16 मि.), 12811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया एक्सप्रेस (1 तास), 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस पुरी एक्सप्रेस (1 तास 15 मि.), 12809 मुंबई हावडा मेल व्हाया नागपूर (1 तास 49 मि.), 12289 मुंबई नागपूर दुरांतो एक्सप्रेस (1 तास 31 मि.), 12111 मुंबई अमरावती एक्सप्रेस (1 तास 57 मि.) उशिराने धावत होत्या.