रेल्वे स्काऊट तीनदिवसीय शिबीर संपन्न

0

भुसावळ। येथील मध्य रेल्वेच्या स्काऊट गाईडच्या चाचा नेहरु ओपन गृपतर्फे स्काऊटर निलेश फंड यांच्या नेतृत्वात जिल्हा शिबीर घेण्यात आले. या शिबिरात प्रार्थना, झेंडा गीत, स्काऊटचे नियम, प्रतिज्ञा, ध्वज, नॉटींग, कंपास, युनिफॉर्म, विपिंग, स्काऊटचा इतिहास यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गृपचे स्काऊटर अनिल तिवारी, विरेेंद्र चावरिया, अर्शद खान, मुकेश शर्मा, सचिव सुशिल पगारे, जिल्हा क्वॉर्टर मास्टर शेख सलिम यांनी शिबिराला भेट देवून विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.

यशस्वीतेसाठी यांनी केले सहकार्य
यावेळी पालक, जिल्हा पदाधिकारी, गृपमधील स्काऊटर अश्‍विन तिरकुडे, शेख मुब्बशीर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जिल्हा पदाधिकारी डॉ. तुशाबा शिंदे, आर.एन. गेडाम, संतोष श्रीवास, सुशिल पगारे, शेख सलिम, राजेेंद्र साळुंके यांचे सहकार्य लाभले.