नवापूर: महाराष्ट्र-गुजरातच्या सीमारेषेवर वसलेले नंदुरबार जिल्ह्यातील एक गाव नवापूर आहे. या स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग गुजरातेत येतो. नुसते स्टेशनच नाही तर एक बाक पण दोन राज्यात विभागला गेला आहे. तिकीट खिडकी आहे महाराष्ट्रात आणि स्टेशन मास्तर बसतात गुजरातला. तिकीट मिळते महाराष्ट्रात तर तिकीटाची रांग असते गुजरातच्या बाजुला. नवापूर रेल्वे पोलीस स्टेशन, केंटरिंग, तिकीट खिडकी महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात तर स्टेशन मास्टर कार्यालय, वेटिंग रूम, पाण्याची टाकी तसेच शौचालय गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात !
स्टेशनवरील घोषणा चार भाषेत
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महा गुजरात आंदोलन यामुळे दोन नवी राज्ये जुन्या मुंबई राज्यातून स्टेट ऑफ मुंबई निर्माण झाली खरी. पण नवापूर मात्र जिथे होते तिथेच राहिले, सीमारेषेवर.
नवापूरचे रेल्वेस्टेशन अजबच
महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नवापूर हे बहुभाषिक शहर आहे. सर्व जाती-धर्माचे लोक येथे रहातात. प्रत्येकाला सर्वच भाषा येतात. मराठी माणूस गुजराती पेपर वाचतो आणि लिहितोही. तसे गुजराती माणसाचे पण आहे. 1 मे महाराष्ट्र रोजी फाळणी झाल्यावर
नवापूरही गुजरातमध्ये जाणार होते. मात्र, स्थानिकांनी आंदोलने करुन विरोध केला आणि नवापूर महाराष्ट्रात राहिले. नवापूर स्टेशन व त्यापलीकडे गुजरातची सीमा म्हणजे उच्छल गाव सुरु होऊन गुजरातमध्ये प्रवेश सुरु होतो. 1 मे 1960 मध्ये मुंबई प्रांतमधून महाराष्ट्र व गुजरात राज्याची फाळणी होऊन निर्मिती झाली. परंतु हे मतदान केंद्र त्याहून जुने आहे. 1952 पासून मतदानाचा हक्क नागरिक बजावत आहे. महाराष्ट्र राज्यातील नवापूर जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळेची स्थापना 1927 ची ब्रिटीशकालीन आहे. सध्या 803 मतदार आहेत. नवापूर शहरातील खाखरफळी आणि रेल्वे स्टेशनवरील मतदार या केंद्रात मतदान करतात.
आता आला नवीन लुक
नवापूर शहर हे बहुभाषिक तर तालुका आदिवासी आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेस्टेशन छोटसे होते. पूर्वी टांगे व बैलगाडीतून येथे शहरातून लोक यायचे.प्रवासासाठी तेच एकमेव साधन होते. लांब पल्ल्यांचा गाडी थांबा येथे मिळत नव्हता. यासाठी अनेक आंदोलने झाली. कालांतराने सुरत-अमरावती थांबा मिळाला. आता नवापूर रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला असून नवीन लुक आला असून सुविधा निर्माण झाल्या आहेत. नवापूर शहराच्या काही अंतरावर उच्छल गाव असून गुजरातला प्रवेश करते. ते नवापूर शहरातील अनेकांनी रहायला घरे घेतली आहेत. ते पूर्ण दिवस महाराष्ट्र अर्थात नवापूर किंवा अन्य शहरात काम अथवा व्यवसाय करुन उच्छल या आपल्या घरी परत जातात, तर काही नवसारी, सोनगड येथून ये-जा करतात.
अजबगजब मतदार संघाचे वास्तव
देश-विदेशात सीमावरून अनेक वाद होतात. परंतु महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर शहरातील जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळेत गुजराती आणि मराठी भाषिक मतदार एकत्रित होऊन मतदान करतात. मतदान केंद्र महाराष्ट्र राज्यात आणि मतदारांची रांग लागते गुजरात राज्यात. शाळेच्या गेटबाहेर गुजरात राज्याची सीमा येते. या मतदान केंद्राची भौगोलिक स्थिती खूप रोचक आहे. पूर्व राज्यात महाराष्ट्र राज्य आहे. पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेत गुजरात राज्य येते. या भागातील काही मतदारांना मतदान करण्यासाठी गुजरात राज्यातून पुन्हा महाराष्ट्र राज्यात यावे लागते. अशी विचित्र स्थिती नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या नवापूर विधानसभा मतदार संघ क्रमांक 204/04 केंद्राची आहे. देशाच्या विकासाचा मार्ग गुजरात राज्यातून जातो. याचे संकेत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रूढ झाले आहेत. परंतु याआधी नंदुरबार लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधींना मतदान करण्याचा मार्ग गुजरात राज्यातून जातो. याचे अजबगजब मतदार संघाचे वास्तव चित्र दिसून येते.