* नवजीवन ऑटो रिक्षा युनियनची मागणी
* आमदार उन्मेष पाटील व मुख्याधिकार्यांनी दिले निवेदन
चाळीसगाव । शहरातील दळणवळणाचा मोठा भार रेलवे प्रवाशी वाहतुकीतून होत असतो त्यातच आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी ऑटो रिक्षाची गरज शरवासीयांसह प्रवाश्यांना भासते. यासाठी रेलवे स्टेशन बाहेर नवीन रिक्षा वाहनतळ तयार करण्यात आलेले आहे. येथे डिव्हायडर सोडून बाहेरचे रिक्षा चालक उभे राहतात. त्यामुळे नंबरवर प्रवाश्यांची वाट बघणारे रिक्षाचालक व्यवसाय विना तसेच लटकून राहतात. प्रसंगी रिक्षा व्यवसायिकांमध्ये हमरीतुमरीवर भांडण होेतात. या करिता वाहनतळावरील रिक्षा स्टॉप परिसरातील पोलीस चौकी ते रेल्वे गेटपर्यंत वन-वे तयार करण्यात यावा. यासाठी सोमवारी आमदार उन्मेष पाटील यांना नवजीवन ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मुकेश चौधरी यांनी निवेदन दिले. यावेळी मोठ्या प्रमाणावर रिक्षा चालक मालक रिक्षा व्यवसायीक उपस्थित होते.
पालिकेत मुख्याधिकार्यांशी चर्चा
पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या दालनात सर्व युनियनचे पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली. निवेदनात रिक्षा स्टॉप भोवती घाणीचे साम्राज्य असल्याची कैफियत मांडली असून रिक्षा येजा करतांना अडचणींचा ठरणारा विजेचा खांब काढण्यात यावा, युनियन च्या कार्यालयासाठी स्टॉपजवळ जागा मिळावी, भाजीपाला विक्रेते भररस्त्यात दुकाने लावून रोजच अडथळा निर्माण करतात त्यांचेवर कारवाई व्हावी, बाहेरून येणार्या रिक्षा व्यावसायिक यांचे मुळे गाडी भरण्यावरून नेहमी वाद होतात याकरिता वन वे मार्ग तयार करावा अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून आपल्या सर्व समस्या सोडवतो असे न पा चे मुख्याधिकारी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
आमदार उन्मेष पाटलांना साकडे
पालिकेचे सत्ताधारी गटाचे नेते राजेंद्र चौधरी,आघाडीचे सुरेश स्वार, नगरसेवक नितीन पाटील, चंद्रकांत तायडे, बापू आहिरे, तसेच पालिका अभियंता राजेंद्र पाटील यांच्याशी पालिकेत चर्चा केल्यानंतर युनियनच्या पदाधिकारी यांनी आमदार उन्मेष पाटील यांना साकडे घातले. आमदार पाटील यांनी रिक्षा व्यवसायिकांची सर्व अडचण समजून घेतली व ताबडतोब आपल्या समस्या दूर करतो असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
नवजीवन रिक्षा युनियन स्टेशन रोड संघटनेचे अध्यक्ष मुकेश चौधरी ,यांच्या सह पदाधिकारी नितीन तायडे, मनोज पाटील, अमोल मोरे, गोपाळ जाधव ,जितेंद्र राजपूत, सुनील चौधरी, किरण चौधरी, सागर गवळी, किरण गवळी, गौरव नागणे, आकाश माने ,अनिल जाधव, सोमनाथ भोई, आप्पा चव्हाण, निलेश पाटील, नितीन परदेशी, आवेश रसूल, सतेज बिर्हाडे, हदीज पठाण, वंदन आहिरे, जाकीर शेख, संकीर्ण गायकवाड, संजय सोनवणे, राजेंद्र नागणे, शिवाजी पवार, शाहरुख शेख, अनिल पाटील, मंगल निकम, सागर देवरे, सुरेंद्र मांडे, शकील खाटीक, के.एस.पाटील , मुशातक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.