रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची झाडाझडती

0

भुसावळ । रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी दुपारी झाडाझडती घेत स्वच्छतेसह अन्नाच्या दर्जाची तपासणी केली.

याप्रसंगी दोन अनधिकृत ट्रॉली आढळल्याने त्या जप्त करण्यात आल्या तसेच सुमारे 25 हजारापर्यंत दंड करण्यात आल्याचे समजते.शुक्रवारी दुपारी चार ते सहा दरम्यान मिश्रा यांच्यासह डीसीएम व्ही.पी.दहाट, स्टेशन मॅनेजर कुठार, वाणिज्य निरीक्षक सुदर्शन पाचपांडे, शैलेश पारे, पीआरओ जीवन चौधरी, प्रवीण जंगले, निरीक्षक आर.आय. मालवीय आदींच्या पथकाने तपासणी केली. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.