रेल्वे स्थानकावर पीओएस मशिन वाढविल्या

0

भुसावळ । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी देशाला डिजीटल बनविण्याचे स्वप्न पाहिले असून त्या अनुषंगाने कार्य सुरु आहे. हीच बाब ध्यानात घेवून मध्य रेल्वेने कॅशलेस व्यवहारांसाठी पाऊल उचलले आहे. त्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नाशिक रोड, भुसावळ आणि अमरावती या रेल्वे स्थानकांवर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी स्वाईप मशिनसह पेटीएम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कॅशलेसमधील अडचणी दूर करणार
रेल्वे स्थानकावरील बुकिंग कार्यालय, पार्सल कार्यालय, गोदाम आणि आरक्षण कार्यालयात पीओएस (स्वाईप मशीन) कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल, पुस्तक विक्री स्टॉल, दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंग या ठिकाणी पेटीएम, मोबीक्विक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभागात नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा, अमरावती, बुरहानपूर व खंडवा या रेल्वे स्थानकावर मोबाईल ऍपव्दारे अनारक्षीत तिकिट खरेदी सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून देशभरातील रेल्वे यंत्रणा कॅशलेस करण्यात येणार आहे. यात काही अडचण आल्यास 138 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.