भुसावळ । येथील रेल्वे स्थानकाच्या उत्तर भागातील नो पार्किंग भागातून एक काळ्या रंगाची हिरो होंडा चोरीस गेल्याची घटना सोमवार 1 रोजी घडली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र नारायण घाटे (रा. प्रसाद पॅलेस, वकील गल्ली, कुलकर्णी प्लॉट) यांच्या मालकीची हिरो होंडा क्रमांक एमएम 19 एजे 3515 ही रेल्वेच्या नो पार्किंगमध्ये उत्तर साईडला उभी करुन त्यांच्या मुलास घेण्याकरीता कार्यक्रमाठिकाणी गेले. परत आले असतांना गाडी नसल्याचे त्यांना दिसून आले. घाटे यांनी संपुर्ण परिसरात गाडीचा शोध घेतला मात्र आपली गाडी मिळून न आल्यामुळे याबाबत राजेंद्र नारायण घाटे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.