जळगाव । रेल्वे स्टेशन परिसरात महापालिकेच्या तसेच शहर पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण काढण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा वाहनाचा ताफा मुंबई अधिवेशनासाठी निघाला असता रेल्वे स्टेशन परिसरात वाहने निघण्यासाठी जागा नसतांना सर्वत्र अतिक्रमण होते. यावरून रात्रीच शहर पोलिसांकडून 21 मार्च रोजी मध्यरात्री 16 जनावर कार्यवाही करण्यात आली. त्यावरच न थांबता शहर पोलिसांनी महापालिकेला पत्र लिहून अतिक्रमण काढण्याची विनंती केली होती. यावरुन कार्यवाही करण्यात आली आहे.
समान कार्यवाही करण्याची मागणी
रेल्वे स्टेशन परिसरातील काही दुकादारानी अतिक्रमण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. आमच्या दुकानाचे फलक जप्ती करण्यात आले बड्या हॉटेल व्यावसायिकाचे फलक तसेच असताना दुजाभाव होत असल्याची तक्रार पोलीस व अतिक्रमण काढणार्या अधिकार्यांना करण्यात आली मात्र कार्यवाहीमध्ये कोणालाही माफी नसल्याचे अधिकार्यांनी दुकानदाराची समजूत काढली आहे. अतिक्रमण विभाग सहकार्य करीत नसल्याचे यावेळी दुकानदारांनी सांगितले.
यांच्यावर झाली कार्यवाही
अतिक्रमण विभागाकडून हॉटेल पूनम, हॉटेल शिल्पा, हॉटेल पूनम, हिरा स्टोअर्स, भारत भूषण हॉटेल, राहुल पण सेंटर यांच्यासह रस्त्यावरील हॉकर्सवर कार्यवाही केली आहे. रस्त्यावर वाहन पार्किग करणारे मोटरसायकल चालक यांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी मोटारसायकलींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.