भुसावळ: रेल्वे हद्दीतील आगवाली चाळ परीसरातील रेल्वेच्या मालकीच्या जीर्ण क्वाटर्सवर गुरुवारपासून रेल्वे प्रशासनाने तोडण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही मोहिम चालणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या प्रचंड बंदोबस्तासह स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत रेल्वे प्रशासनाकडून 21 डिसेंबरपासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास जीर्ण क्वाटर्स जेसीबी तोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.