नवी दिल्ली : असिस्टंट लोको पायलट्स, टेक्निशियन्स, गँगमन, स्विचमन, ट्रॅकमन, केबिनमन, वेल्डर्स, हेल्पर्स आणि पोर्टर्स आदी पदांसाठी 90 हजार जागा रेल्वेकडून भरल्या जाणार आहेत. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ही रिक्त पदे भरण्यात येत आहेत. रेल्वेत सुरक्षिततेशी संबंधित जवळपास 1.2 लाख जागा रिक्त आहेत. त्यामुळे अधिकाधिक रिक्त जागांवर कर्मचारी नियुक्त करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत नोकरभरती झाली नव्हती. वर्षाला 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. अशात रेल्वेच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही. आता नोकरभरतीवर सरकारला दरवर्षी अतिरिक्त 4 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.