अलिबाग– अलिबाग-उरण या दोन तालुक्यांना जलमार्गे जोडमार्या रेवस-करंजा तरसेवेची दरवाढ रद्द करावी, अशी मागणी ऑल इंडीया पॅसेंजर असोसिएशनने राज्याच्या परिवहन व बंदर विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तरसेवेचे पूर्वीचे तिकीट दर 13 रुपये असून, त्यामध्ये वाढ करुन सध्या 20 रुपये तिकीट आकारण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग व उरण या दोन तालुक्यांना रेवस-करंजा या तरसेवेने जलमार्गे जोडले आहे. रेवस-करंजा हे जलमार्गे अंतर केवळ सव्वा कुलोमीटर लांबीचे आहे. यामुळे या मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या सव्वा किलोमीटर लांबीच्या प्रवासासाठी पूर्वी 13 रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता, मागील काही दिवसांपासून यामध्ये वाढ करण्यात आली असून, 20 रुपये तिकीट दर आकारले जात आहे.
तिकीट दरात सात रुपयांनी वाढ झाल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑल इंडीया पॅसेंजर असोसिएशननेही ही दरवाढ अन्यायकारक असल्याचे म्हंटले आहे. संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी संघटनेच्या
राज्याच्या परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव मनोज सैनिक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.