शिंदखेडा – तालुक्यातील रुदाणे, नवापाडा व चौकीपाडा येथील शिधापत्रिका धारकांना तीन ते चार महिन्यापासून रेशन मिळत नसल्याची तक्रार रुदाणे येथील रेशनधारकांनी नायब तहसिलदार एस.बी.राणे यांचाकडे निवेदनाद्वारे केली आहे. रुदाणे, नवापाडा व चौकीपाडा येथील शिधापत्रिकाधारकांना मागील तीन ते चार महिन्यापासून रेशन मिळाले नाही. याविषयी पुरवठा अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते, मात्र याबाबत त्यांनी कुठलाही निर्णय दिला नाही. रेशनिंग मिळत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
रेशन वेळेवर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा
सप्टेंबर महिन्याचा रेशन मिळावे व वरील ग्रामस्थांना रेशन पुरवठा देवी गावात उपलब्ध करून घ्यावा, अन्यथा रुदाणे, नवापाडा व चौकीपाडा येथील ग्रामस्थ शिंदखेडा तहसिल कार्यालयात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन नायब तहसिलदार एस.बी.राणा यांना दिले. यावेळी विठ्ठल महाले, विठ्ठल बागुल, शानाभाऊ भिल, दशरथ भिल, चंद्रसिंग भिल, आसाराम भिल, मल्हार वाघसह ग्रामस्थ उपस्थित होते.