रेशनिंगच्या मालासाठी खंडणी मागितली, सावद्यात चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ: स्वस्त धान्य दुकानाचे धान्य वाहनातून नेत असताना ते काळ्याबाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याचे धमकावत तक्रार दाखल न करण्यासाठी पाच हजारांची खंडणी मागणार्‍या चौघांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक समशेर नजीर तडवी (मोरव्हाळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी पिंटू वाघ, सावन मेढे व अन्य सोबतच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेदरम्यान घडली. तपास उपनिरीक्षक गणेश आखाडे करीत आहेत.