रावेर : ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही तसेच तालुक्याबाहेरील रहिवास आहे मात्र लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कुटुंबांना तसेच मोल-मजुरी करणार्या नागरीकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य मिळणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अश्या कुटुंबासाठी शासनाकडून आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत तांदुळ व चना पुरवठा केला जाणार आहे. अश्या कुटुंबाना मे व जून अश्या महिन्यांचे धान्य पुरवले जाईल परंतु शासकीय गोडावूनवर फक्त तांदूळ प्राप्त झाले असून चना प्राप्त होणे बाकी आहे. जुन महिन्यात मे महिन्यांचे चना प्राप्त झाल्यावर वाटप केले जाणार आहे. रावेर तालुक्यातील किंवा बाहेर गावच्या रहिवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.