तूरदाळीची विक्री वाढविण्यासाठी रेशन दुकानदाराच्या कमीशनमध्ये वाढ
मुंबई:- राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर तूर डाळ शिल्लक असल्याने आता रेशन दुकानदारांना अमिश दाखवून तूर विक्रीचा नवा फंडा शासनाने अमलात आणला आहे. सरकारची तूरदाळ विक्री होत नसल्यामुळे तूरदाळीची विक्री वाढावी यासाठी रेशनदुकानदारांना ३ रूपये प्रतिकिलो कमिशन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूढे रेशन दुकानामधून तूर दाळीची विक्री केल्यानंतर कमिशन म्हणून ३ रूपये दिले जाणार आहेत. या कमिशन वाढीमुळे तूरदाळीची विक्री वाढेल असे शासनाला वाटत आहे.
सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तूरीची तूरदाळ केली आहे. २ लाख क्विंटल तूरदाळ सरकारने भरडई केली आहे. सरकारने तयार केलेली तूरदाळ विकायची कशी असा प्रश्न सरकार समोर उपस्थित राहिला आहे. सरकारची तूरदाळ विक्री करण्यासाठी रेशन दुकानामध्ये तुरदाळीची विक्री करण्यासाठी रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. तूरदाळीसाठी रेशनदुकानदारांना प्रतिकिलो ३ रूपये कमिशन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
तूरदाळीच्या विक्रीसाठी २ रूपये २० पैसे कमिशन दिले जात होते. तूरदाळीची किंमत जास्त असल्यामुळे जास्त पैसे गुंतवूण देखील कमिशन कमी मिळत असल्यामुळे तूरदाळ विक्रीसाठी रेशन दुकानदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसत होते. यामुळेच कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने आज घेतला आहे. राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर तूरदाळ पड़ून आहे. तब्बल २ लाख क्विंटल तूरदाळ आहे तर आणखी २० लाख क्विंटल तूर आहे. त्यामुळे ही तूरदाळ तसेच तूर कशी विकायची याचा मोठा प्रश्न अजूनही सरकार समोर आहे.