रेशन दुकानातून धान्याचे वाटप करण्याची पीआरपीची मागणी

0

मुक्ताईनगर । गेल्या दिड महिन्यापासून तालुक्यातील मेहुण येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्याची वाटप झाली नसल्याने धान्याची वाटप त्वरीत करावी, असे निवेदन पीआरपीतर्फे तहसिलदारांना देण्यात आले. पिपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेहुण गाववात मोठ्या संख्येने गरीब कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्याकडे एपीएल, बीपीएल तसेच अंत्योदयची कार्ड आहे. असे असतांना 1 एप्रिल ते 19 मे 2017 अशा दिड महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरीत झालेले नाही.

याबाबत धान्य दुकानदारास विचारपूस केली असता शासनाकडूनच स्वस्त धान्य दुकानास धान्य मिळालेले नाही. स्वस्त धान्य दुकानांना धान्य पुरवठा उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळेच धान्य वितरीत होत नसल्याचे सांगितले. यामुळे मात्र गरीब कुटुंबिय स्वस्त धान्यापासून वंचित आहे. तरी शासनातर्फे सदर धान्य दुकानांना धान्य पुरवठा करण्यात यावा. सदर धान्य 23 मे पर्यंत न मिळाल्यास 25 मे पासून पीआरपी तालुकाध्यक्ष संजू इंगळे हे तहसिल कार्यालयासमोर उपोषण प्रारंभ करतील, असे निवेदनात म्हटले आहे.