रेशन दुकानात निकृष्ट ज्वारीचे वितरण

0

रावेर । तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये तब्बल वर्षभरानंतर ज्वारी आली आहे. जुनी ज्वारी असल्याने दारु पाडण्यालायकची ज्वारी शासनाने गरिबांना भाकरीसाठी पाठवली आहे. त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. शासनाने मार्च 2016 मध्ये खरेदी केलेली ज्वारी आता वितरीत करायला सुरुवात केली आहे. किड लागून फपुटा झालेली ज्वारी पोटासाठी गरीब लोक घेत आहे.

गरीबांना धान्याचा उपयोग होईना
यंदा पाऊस चांगला झाला असून दुष्काळी भागात वितरीत होणारी ज्वारी जिल्ह्यात सर्व रेशन दुकानांवर प्राप्त झाली आहे. आधीच गरीब कुटुंबांच्या घरात अनेक वर्षांपासून मिळणारे धान्य या महिन्यात निकृष्ट आलेले दिसत आहेे. त्यामुळे गरीबांना या धान्याचा काही एक उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.

राज्य व देशात अच्छ दिन सुरु असतांना रेशन दुकानात आलेली ज्वारी अचंबित करणारी आहे. अत्यंत निकृष्ट आणि किड लागलेली ज्वारी असून गरीब कुटुंबांच्या आरोग्याशी खेळण्यापेक्षा एक महिना धान्य वितरीत न केले असते तर बरे झाले असते. आता आलेली ज्वारी शासनाने पुढे अशी पाठवू नये, एवढीच मागणी आहे.
– पिंटू महाजन, सचिव, राष्ट्रवादी कार्यालय