रेशीमगाठीच्या आठवणींना उजाळा देणार वेडिंग नॉट्स

0

पुणे : लग्नातील आंबट-गोड क्षणांच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करून ठेवल्या जातात त्या छायाचित्रांच्या माध्यमातून…! काळाची पाने उलटल्यावर आपली जुनी प्रतिमा बघून त्या आठवणी पुन्हा ताज्या होतात… आणि आनंद देतात. याच विषयावर आधारित वेडिंग नॉट्स ही छायाचित्रांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जनशक्ती या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत.

पुण्यातील जे पी असोसिएशन संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 25 मे पर्यंत मुदत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कॅन्डीड, विधी किंवा प्री-वेडिंग अशा तीन विषयांपैकी एका विषयाची निवड करता येणार आहे. सहभागी होण्यासाठी रुपये 100 नाममात्र मूल्य आहे. सर्व स्पर्धकांची छायाचित्रे बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे प्रदर्शनात 27, 28, 29 मे रोजी रसिकांना बघण्यासाठी विनामूल्य खुली असणार आहेत. स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांकाने गौरवण्यात येणार असून त्यांना स्मृतिचिन्हासह अनुक्रमे 5000, 3000 आणि 2000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास हरीश 8007903721 किंवा चिन्मय 8149896898 यांच्याशी संपर्क साधावा.

वेगळ्या संकल्पनांसाठी
लग्न सोहळ्यातील छयाचित्रांकडे एकाच चौकटीतून बघण्यापलीकडे त्यातून काहीतरी वेगळा विचार आणि संकल्पना पुढे याव्यात, अशी भावना या प्रदर्शनामागे आहे. फक्त दाम्पत्य बदलून एकसारख्या ढंगाची छायाचित्रे काढणे कमी होऊन त्यात अधिकाधिक नावीन्य यावे यासाठीचा हा प्रयत्न आहे.
-शुभंकर वाघोले, आयोजक