आमदारांनी उन्मेश पाटलांनी केला सत्कार
चाळीसगाव- आजच रिलीज झालेल्या ‘रे राया’ मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असलेल्या अभिनेता सुदर्शन पाटील यांची सोमवारी हंस चित्रपट गृहात तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली. लहान पणापासून शिक्षणासाठी बाहेर गावी असलेला बोदर्डे, ता.भडगाव येथील सुदर्शन पाटील याने उंच उडी खेळात देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. अल्पभूधारक शेतकरी रमेश पाटील यांचा मुलगा असलेले सुदर्शन हे घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कोपरगाव येथील आत्मा मालिक ट्रस्ट च्या शाळेत दहावी उत्तीर्ण झाले. निर्माता संजय पोपटांणी, दिग्दर्शक मिलिंद शिंदे व कथाकार किरण पाटील या अहमदनगरवाशी मंडळींनी खेळाडूवर चित्रपट बनविण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी परिसरात शोध घेतला असता त्यांनी उंचउडीचा सुदर्शन पाटील गुणी खेळाडूला चक्क ‘रे राया’ चित्रपटात काम करायची संधी दिली. ‘रे राया’ या चित्रपटाचा सोमवारी शहरात पहिला शो होता. या निमित्ताने अभिनेता सुदर्शन पाटील यांचा सत्कार समारंभ भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी आयोजित केला होता.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, धर्मा वाघ, पं.स.सदस्य दिनेश बोरसे, भाऊसाहेब पाटील, माजी नगरसेवक महेंद्र पाटील, प्रभाकर चौधरी, बापू आहिरे, नरेंद्र काका जैन, छोटू पाटील, बबन पवार, भिकन पवार, विजय जाधव, माजी सैनिक राजेंद्र भोसले, काशिनाथ भोसले, समाधान पाटील, शेखर बोरसे, शिवनारायण प्रेमभक्त यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अभिनेता सुदर्शन पाटील यांची हंस थिएटर ते विठ्ठल मंदिर पर्यंत घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.
आवडत्या खेळात मेहनत घ्यावी -सुदर्शन पाटील
याप्रसंगी ‘जनशक्ती’ प्रतिनिधीशी बोलताना सुदर्शन पाटील म्हणाले की, तरुणांनी आवडत्या खेळात खूप मेहनत घ्यावी. मी देखील चांगला खेळाडू होण्यासाठी प्रयत्न केले. देश पातळीवर खेळलो त्यातून मला भूषण प्रधान सारख्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील शेतकर्याचा मुलगा असून ही चित्रपटात काम करण्याची केवळ खेळाडू असल्याने दिगग्ज मराठी कलावंतासोबत संधी मिळाली याचा मोठा आनंद आहे.