इडियन वेल्स । टेनिस खेळाचा बादशहा रॉजर फेडररने इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धे पाचव्या जिकून नोव्हाक जोकोव्हीच याच्या बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात रॉजर फेडररने स्टान वॉवरिन्कावर मात करून स्पर्धेचे जेतेपद जिंकले. फेडररने अंतिम फेरीत वॉवरिन्कावर 6-4, 7-5 अशी मात केली. रॉजर फेडरला गेल्या वर्षी गुडघ्यावरील शस्त्रक्रिया झाल्यमुळे टेनिसपासून लांब राहावे लागले.
यातून सावरून फेडररने जानेवारी महिन्यात दमदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावून 18 वे ग्रँडस्लॅम जिंकले होते. याआधी फेडररने 2004, 2005, 2006 आणि 2006 साली ही स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन ओपन किंवा इंडियन वेल्स जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर नव्हतेच. फक्त क्रमवारीत पहिल्या आठ खेळाडूंच्या आत स्थान मिळवण्याचे उद्दीष्ट होते.