रॉजर फेडरर, रफाल नदालची आगेकूच कायम

0

न्यूयॉर्क । माजी विजेता रॉजर फेडरर आणि रफाल नदालने अमेरिकन अपोन टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीत आपली आगेकूच कायम राखली आहे, तर महिला एकेरीत मात्र मोठी उलथापालथ झाली आहे. महिला एकेरीतील आघाडीच्या आठ खेळाडूंपैकी पाचवे मानांकन मिळालेल्या खेळाडूचा पराभव झाला आहे. फेडररने न्यूयॉर्कमधील 80 वा सामना जिंकताना दुसर्‍या सामन्यात मिखाईल याउजेनीवर 6-1, 6-7, 4-6, 6-4, 6-2 असा विजय मिळवला. अन्य लढतीत सध्या नंबर वन असलेल्या नदालने जपानच्या तारो डॅनियलचे आव्हान 4-6, 6-3, 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. पुढल्या फेरीत फेडररचा सामना स्पेनच्या 35 वर्षीय फॅलियानो लोपेझशी होईल. लोपेझविरुद्ध फेडररची कामगिरी 12-0 अशी आहे. आंद्रे रूबलेव्ह हा तिसर्‍या फेरीत स्थान मिळवणारा दुसरा युवा खेळाडू ठरला.

आंद्रेने बुल्गारियाच्या सातवे मानाकंन मिळालेल्या ग्रिगोर दिमित्रोव्हला 7-5, 7-6, 6-3 असे हरवले. 19 वर्षीय अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ ऑस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डा ॅमनिक थिएमकडून पराभूत झाला. अर्जेटिंनाच्या जुआन मार्टिन डेल पात्रोने पात्रता फेरीचा अडथळा पार करून मेन ड्रॉमध्ये स्थान मिळवणार्‍या स्पेनच्या ड्ड्रियन मॅनेंडेज मसेराइसला -2, 6-3, 7-6 असे हरवले. महिला एकेरीच्या लढतींमध्ये अमेरिकेची शेल्बी रॉजर्स आणि ऑस्टे्रलियाची डारिया गॉवरिलोव्हा यांच्यातील सामना दीर्घकाळ रंगला. जवळपास साडेतीन तास रंगलेल्या सामन्यात रॉजर्सने 7-6, 4-6,7-6 असा विजय मिळवला. रशियाची आठवी मानांकित स्वेतलाना कुझ्नेत्सोाव्हला जपानच्या कुरूमी नाराने 6-3, 3-6, 6-3 असे नमवले. महिला एकेरीतील नंबर वन खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोव्हाने अमेरिकेच्या निकोल गिब्जचा 2-6, 6-3,6-4 असे हरवले.