रोकडे तांडा येथुन 40 वर्षीय महिला बेपत्ता

0

चाळीसगाव । तालुक्यातील रोकडे तांडा येथील 40 वर्षीय महिला 20 फेब्रुवारी 2018 रोजी राहते घरुन बेपत्ता झाली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता उर्फ तुळसाबाई इदल जाधव (40) रा.रोकडे तांडा ता. चाळीसगाव या महिला 20 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास माहेरी लोंजे गावी आसरांची पुजा करुन येते असे सांगुन घरुन निघुन गेल्या. मात्र त्या अद्याप परतल्या नाही त्यांचा शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने त्यांचे पती इंदल गुलाब जाधव (50) यांनी 23 फेब्रुवारी 2018 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरुन हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. वर्णन शरीर सडपातळ, रंग काळा सावळा, उंची साडेपाच फुट, नाक सरळ, अंगात हिरव्या रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाउज असे आहे. पुढील तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत.