चोपडा । तालुक्यात सहकारी सूतगिरणी व साखर कारखाना आहे.त्यासाठी लागणारा मुबलक कच्चा माल आहे.त्यामुळे शेकडो – हजारो रोजगार उपलब्ध होतात. त्यातून परिसरात सुबत्ता निर्माण होते.आपला तालुका वाहतूक सुविधा पासून लांब असला तरी या दोन्ही प्रकल्पाने व उपलब्ध पाणी स्त्रोतांनी विकास साधता येणे शक्य आहे.तालुक्यात रोजगारक्षम प्रकल्प सशक्तपणे चालले पाहिजेत.आमच्या मुक्ताईनगरला सूतगिरणी असली तरी हा मोठा प्रशस्त प्रकल्प पाहून आपल्याला आनंद वाटला, आपली मदत लागल्यास नक्कीच करु असे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीला खासदारांनी भेट देवून पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या. खा.खडसे यांनी सूतगिरणीचा परिसर फिरून त्याच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
चोपडा सूतगिरणीला खासदारांची भेट
यावेळी चेअरमन व माजी आमदार कैलास पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांचा गौरव केला. याप्रसंगी उपस्थित प्रामुख्याने पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, चोसाकाचे व्हा.चेअरमन शशीकांत देवरे, शेतकी संघाचे उपाध्यक्ष हिंमतराव पाटील यांचा सत्कार सूतगिरणीचे व्हा.चेअरमन पी.बी.पाटील, संचालक प्रकाश रजाळे, के.डी.चौधरी, शशीकांत पाटील, रंजना नेवे यांनी केला. यावेळी कार्यकारी संचालक मांतेश महाजन यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत नेवे यांनी केले. आभार संचालक एस.बी.पाटील यांनी मानले. यावेळी संचालक तुकाराम पाटील, माधवराव पाटील, भाजपचे पदाधिकारी राजेंद्र डाभे, डॉ.मनोज सनेर, पिंटू पावरा, भरत सोनगिरे, पंकज पाटील, प्रकाश पाटील, लक्ष्मण पाटील, अधिकारी विजय पाटील, काळे,आदि उपस्थित होते.