रोजगार प्रशिक्षणासाठी 25 जुलै रोजी मुलाखती

0

जळगाव । आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता माहिती, मार्गदर्शन केंद्र पंचायत समितीजवळ, रावेर येथे मुलाखतीचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी,प्रशिक्षणाकरिता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असून साडेतीन महिन्याचे प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल.