रोजगार मेळाव्यात उद्योजकांकडून उमेदवारांना नोकरीची संधी

0

धुळे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे व शासकीय तांत्रिक विद्यालय जेल रोड धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसाचा रोजगार मेळावा नुकताच शासकीय तांत्रिक विद्यालय जेलरोड, धुळे येथे सहाय्यक संचालक बी.जी.येरमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यासाठी उद्योजकांकडून 350 रिक्त पदे कळविण्यात आली होती.

यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय, बी.ए. पदवीधर अशी ठेवण्यात आली होती. यामध्ये पुढील कंपनीमार्फत पुढील प्रमाणे रिक्त जागा भरण्यात आल्या. लक्ष्मी वेवींग प्रा.लि.. 40 जागा, विठ्ठल टेक्स प्रा.लि. 45 जागा, अरुणोदय फबरे प्रा.लि. 40 जागा, वर्षा केमिकल्स 20 जागा, युरेका फोर्ब्स, धुळे 25 जागा, कोजन्ट ई सर्व्हीसेस प्रा.लि. बडोदा, 100 जागा, नवभारत फर्टीलायझर, औरंगाबाद 100 जागा. यावेळी सर्व कंपनीचे व्यवस्थापक रोजगार मेळाव्यासाठी उपसिथत होते. यावेळी सहाय्यक संचालक भै.गो. येरमे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, उमेदवारांनी कौशल्य विकासाकडे वळण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकास अंतर्गत ग्रामीण भागातील मुलांना तसेच शहरी भागातील उमेदवारांनाही रोजगाराची संधी प्राप्त होवू शकते. शिक्षण काहीही झाले तरी त्याला कंपनीत कौशल्य विकसीत करणे गरजेचे आहे. उमेदवारांनी त्याचा परिपूर्ण फायदा घ्यावा. रोजगार मेळाव्यासाठी कौशल्य विकासचे अे.आर. ठाकरे, टेक्नीकल हायस्कुलचे ठाकरे यांनी नियोजन केले तर मेळावा यशस्वी होणेसाठी तेजपाल, गिरासे, प्रकाश भोई यांनी योगदान दिले.