शिंदखेडा। येथील रोटरी क्लबतर्फे शाडूमातीपासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळेत 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील कमलाबाई कन्या विद्यालयातील कलाशिक्षक केदार नाईक यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन रोटरी अध्यक्ष हर्षल अहिरराव यांनी केले. सूत्रसंचालन संदीप गिरासे यांनी केले. सदस्य कार्यशाळेत सलग चार तास वेळ देऊन विद्यार्थ्यांनी उत्साह व आवडीने मार्गदर्शनातून गणेशमूर्ती स्वत: साकारल्या.
यांची होती उपस्थिती
सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तर कल्पकतेतून सुबकमुर्ती साकारणार्या तीन विद्यार्थ्यांना विनोद कृषीधन यांच्यामार्फत बिजासनी ग्रुपचे रावसाहेब अनिल वानखेडे यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यशाळेत रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या प्रदीप दीक्षित, सुरेश पाटील यांची पत्रकार मित्रांसह विशेष उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी हर्षल अहिरराव, देवेंद्र नाईक, संदीप गिरासे, सुनिल वाडिले, संदीप अहिरराव, संजय पारेख, हितेंद्र जैन, सुजय पवार, प्रदीप गिरासे, विनोद जैन, गोपाल परमार, विजय जाधव, प्रदीप परदेशी, सुनिल मोरे यांनी कामकाज पाहिले.