मुरबाड : तालुक्यात पद्मश्री अण्णासाहेब जाधव, भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित सरळगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरळगाव येथे नुकताच कॅ. र. मा. ओक हायस्कूल माजी विद्यार्थी संघ व कल्याण रोटरी क्लबतर्फे जवळपास 76 गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला. यावेळी कॅ. र. मा. ओक हायस्कूल कल्याणचे अनंत जोशी, योगेश कल्हापुरे, प्रीती दिवटे, संदेश कल्हापुरे, श्रीदास मरळ, सौरभ हजारे, अथर्व पटवर्धन, ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्यासह सरळगाव विभागातील पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब कल्याणचे अध्यक्ष योगेश कल्हापुरे यांनी सांगितले की मुरबाड तालुक्यात आमच्या रोटरी क्लबतर्फे सन 2007 पासून आमचे काम सुरु आहे. आम्ही गरीब तसेच अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून ते गणवेश वाटप करण्यापर्यंत मदत करतो. तसेच काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतो. आम्ही यासाठी सरळगाव कनिष्ठ महाविद्यालयाची निवड केली. जर तालुक्यात अजून कोणत्या शाळेला किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात हवा असेल तर आमचा कल्याण रोटरी क्लब त्यासाठी सज्ज आहे. असे आवाहन योगेश कल्हापुरे यांनी केले. तसेच आमची खरी ओळख तालुक्यास करून देणारे मुरबाड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरबाडे हे आहेत. ते आम्हाला नेहमीच सहकार्य करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरळगाव हायस्कूलचे सहशिक्षक बाळासाहेब वाळीज यांनी केले.