रोटरीच्या सेवा कार्यामुळे गरजूंच्या चेहर्‍यावर समाधान

0

जळगाव । रोटरी सदस्यांनी दिलेल्या देणगीतून वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सेवाकार्य करता येते त्यामुळे गरजू व्यक्तींच्या चेहर्यावर समाधान पाहावयास मिळत असल्याचे रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ.के.एस.राजन यांनी प्रतिपादन केले.गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या प्रांतपालाच्या अधिकृत क्लब भेटी प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सहप्रांतपाल वर्धमान भंडारी, अध्यक्ष डॉ.तुषार फिरके, मानद सचिव मुकेश महाजन यांची उपस्थिती होती. रोटरी फाऊंडेशनला देणगी देणार्‍या रोटरी सदस्य राजू अडवाणी, पांडुरंग पाटील, शशिकांत कुलकर्णी, जयेश ठाकूर आदिंना पॉल हेरीस फेलोशिप डॉ. राजन यांच्याकडून प्रदान करण्यात आली. यावेळी क्लब कार्याविषयीची 10 मिनीटांची लघुचित्रफित दाखविण्यात आली. विशेष उपस्थिती असलेल्या प्रांतपालांच्या पत्नी डॉ.भाग्यलक्ष्मी राजन यांचा सत्कार डॉ.काजल फिरके यांनी केला. स्मित फिरके याने गिटारावर सादर केलेल्या राष्ट्रगीताने समारोप झाला.

सदस्यांनी साधला संव
एसएनडीटी महिला महाविद्यालयात प्रांतपालाच्या उपस्थितीत मुलींच्या रोटरीक्ट क्लबची स्थापना व सॅनेटरी नॅपकीन वेंडीग मशीन बसविण्यात आले. नंदीनीबाई मुलींच्या विद्यालयात देखील सॅनटेरी नॅपकीन वेंडींग मशीन बसविण्यात आले. मनपाच्या शाळा क्रं.50 मध्ये क्लबतर्फे टॉयलेट ब्लाक बसविण्यात आले. हुडको परिसरातील ज्ञान साधना विद्यालयात क्लबतर्फे चालविण्यात येणार्या प्रौढ साक्षरता वर्गास डॉ.राजन यांनी भेट देऊन संवाद साधला.