चाळीसगाव । सर्वच क्षेत्रात सृजनशीलता निर्माण होऊन नाविन्याची कास धरली आहे. त्यामुळे पारदर्शकता, झटापटात, कल्पकतका सर्वांना च आवडतात त्या सर्वांनाच परिणाम प्राथमिक शिक्षणापासून ते महाविदयालयीन शिक्षणाकडे व्हायला सुरुवात झाली आहे. प्राथमिक शिक्षण संपूर्ण डिजिटल करण्याकडे शासनाचे लक्ष असून या साठी सर्व तो परी शिक्षण विभाग लक्ष घालत आहे. आज डिजिटल शिक्षण हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राथमिक शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांनी रोटरी मिल्क सिटी क्लब ऑफ चाळीसगाव आयोजित येथील राजपूत मंगल कार्यालयात तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी संस्थेतील 25 शाळांना इ लर्निंग संचाचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी 28 रोजी सकाळी मार्गदर्शन करतांना केले.
यांनी केले मार्गदर्शन : यावेळी संजय बारीस, स्वप्नील निकम, शब्बीर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाबद्दल माहिती अध्यक्षा मेघा बक्षी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संतोष मालपुरे यांनी केले. यात त्यांनी इ लर्निंग चा संपूर्ण आढावा सादर केला. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्ष मेघा बक्षी, सचिव संतोष मालपुरे, शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील, बीईओ सचिन परदेशी, प्रशासन अधिकारी दिलीप माळी, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, संजय बारीस, दिनेश बोरसे, लालचंद बजाज, चंद्रकांत ठोंबरे, सुनीता घाटे, विकास चौधरी, दीपक पाटील यांच्यासह रवींद्र शिरुडे, अरुण भावसार, निलेश गुप्ता, विमलताई चौधरी, प्रकाश कुलकर्णी, रमेश पोतदार, आधार महाले, माया सावंत, सुनीता बंग आदी मान्यवरांसह तालुक्यातील केंद्र प्रमुख, मुख्यध्यापक व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम किशन चौधरी, माधुरी जाधव, नुपूर बक्षी यांनी घेतले.
14 व्या वित्त आयोगातून सहकार्य
रोटरी मिल्क सिटीने 25 सेट इ लर्निंग चे वाटप करून शिक्षणात बदल घडवणीचे प्रक्रियेत सहकार्य केले आहे यामुळे ग्रामीण भागातील शाळा समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला असून ग्रामीण विद्यार्थी आधुनिक शिक्षण प्रवाहात येतील व एक समृद्ध पिढी तयार करण्याच्या रचनेत मिल्क सिटीचा सहभाग आदर्श असल्याचा सहभाग नोंदवला आहे. उपसभापती संजय पाटील व दिनेश बोरसे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांचा विकास करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून आर्थिक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.