रोटरीतर्फे 51 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0

जळगाव : रोटरी सेंट्रल क्लबतर्फे 51 गरीब व गरजू व्यक्तींच्या विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख कल्पेश दोशी यांनी दिली. गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये झालेल्या यंदाच्या 22 व्यक्तींवरील विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया कृतज्ञता कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष डॉ.नरेंद्र जैन, अध्यक्ष संजय तोतला, सहसचिव मनोज पाटील यांची उपस्थिती होती.

शिबिरातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार्या डॉ.अभय गुजराथी, डॉ.सचिन देशमुख, प्रकल्प प्रमुख कल्पेश दोशी, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.अशोक पाध्ये यांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. तर आर्थिक योगदान देणारे महेंद्र रायसोनी, सीए अनिल शाह, संतोष अग्रवाल, एस.के.वाणी, ऍड.श्रीओम अग्रवाल, संदीप मुथा, महेंद्र बाफना, डॉ.आनंद पाटील, अजय जैन, हेमंत कोठारी, प्रा.स्नेहलता परशुरामे, अपर्णा भट-कासार, धनराज रायसिंघानी यांचा सत्कार करण्यात आला.

शस्त्रक्रिया झालेल्यांपैकी राजेंद्र वाणी, रतन बडगुजर व विमलाबाई चौधरी यांच्या वतीने त्यांची मुलगी जयश्री चौधरी यांनी हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त करुन रोटरी सेंट्रल विषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शगुनाबाई पाटील, सुमनबाई चौधरी, चंद्रकांत झोपे, विकास उज्जैनकर, सुभाष शुरपाटणे आदी शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती कुटुंबियांसह उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलन मेहता यांनी केले. प्रारंभी रोटरी सदस्य बंटी छाबडा यांना श्रद्धांजली तर रोटरी सेंट्रलचे माजी अध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्या सिनेट निवडणुकीतील विजयाबद्दल रोटरी सेंट्रल तर्फे अभिनंदन करण्यात आले.