रोटरी आणि ईनरव्हील रेलसिटी ने केला महादेव घाट स्वच्छ ..
काल गणपती विसर्जन झाले पण नदीकाठी गणपती बाप्पाचे काही भाग ,नारळाच्या कुंच्या,केळीचे खांब ,प्रसाद ,अर्धवट जळालेल्या वाती व उदबत्ती ,पूजेचे सामान,निर्माल्य पडलेले होते .त्यामुळे कालांतराने दुर्गंधी पसरते ,रोगराई पसरण्याचा संभव असतो म्हणून आज दि 29सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या सदस्यांनी भुसावळ तापी नदी महादेव घाट स्वच्छ केला .जवळपास 100 मीटर चा हा घाट बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झाला .
हा आमचा प्रयत्न पुरेसा नसला तरी पर्यावरण शुद्धी साठी हा एक खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे असे मत ईनरव्हील क्लब च्या अध्यक्षा रेवती मांडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले .या ऊपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार ,सचिव तेजस नवगाळे,विकास पाचपांडे,चेतन पाटील ,सोनू मांडे ,प्रवीण वारके ,रणजित खरारे तर ईनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रेवती मांडे ,सचिव सीमा सोनार ,सुनीता पाचपांडे,जयश्री चौधरी यांनी परिश्रम घेतले .