रोटरी क्बलचा नुतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा

0

नंदुरबार । येथील रोटरी क्लबचा नुतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रोटरी क्लब, नंदुरबारच्या अध्यक्ष म्हणून रविंद्र कुलकर्णी यांना तर सचिव म्हणून पंकज पाठक यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. कन्यादान मंगल कार्यालय, नंदुरबार येथे दि.9 जुलै रोजी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, हिरा उद्योग समुहाचे प्रमुख डॉ.रविंद्र चौधरी, रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य यशवंत स्वर्गे, मावळते अध्यक्ष जितेद्र सोनार, मावळते सचिव शब्बीरभाई मेमन, प्रफुल्ल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

हे मान्यवर होते उपस्थित
यावेळी रोटरी क्लब, नंदुरबारच्या सन 2017-18 वर्षाकरीता अध्यक्ष म्हणून रविंद्र कुलकर्णी यांना तर सचिव म्हणून पंकज पाठक यांच्याकडे पद्भार सोपवून त्यांना प्रमुख पाहुणे डॉ.मोहन चंदावकर यांनी पदग्रहणाची शपथ दिली. ठाणे येथील रोटरी डिस्ट्रीक्ट 3142 चे डीजीएन व प्रसिद्ध गायनॉकॉलीजीस्ट डॉ.मोहन चंदावकर यांनी पदग्रहण अधिकारी म्हणून काम पाहीले. मावळते सचिव शब्बीर मेमन यांनी मागील वर्षाचे अहवाल वाहन केले. तर मावळते अध्यक्ष जितेंद्र सोनार यांनी गतवर्षात केलेल्या कामांचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ.चंद्रकांत रघुवंशी आपल्या मनोगतात म्हणाले की, रोटरी क्लब एक सामाजिक संस्था असून नेहमीच समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. यावर्षी सुद्धा त्यांनी नगरपालिका व रोटरी क्लबच्या माध्यमातून एक्स-रे मशिन व सोनोग्राफी केंद्र सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.