रोटरी क्लबचे कार्य गौरवास्पद

0

डीआरएम आर.के.यादव ; शहरात ऑलम्पिक स्पर्धांचे उद्घाटन

भुसावळ : रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात चांगले काम करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांंसाठीही सुध्दा स्मार्ट अ‍ॅक्टीव्हीटी करावी जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकेल, असे प्रतिपादन डीआरएम आर.के. यादव यांनी येथे केले. एन.के.नारखेडे इंग्लीश मिडीअम स्कूल व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्यातर्फे आयोजीत ऑलम्पिक खेळाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

शहरातील रेल्वे पटांगणावर शनिवारी सकाळी आठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन यादव यांच्या हस्ते झाले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीनिवास एन. नारखेडे अध्यक्षस्थानी होते. इलेक्टेड डिस्ट्रीक गर्व्हनर राजीव शर्मा, चेअरमन पी.व्ही. पाटील, ऑननरी जॉईट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे, रोटरी अध्यक्ष आशिष पटेल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, डॉ्य जगदीश अत्तरदे, देवेद्र वाणी, रोटरी क्लब भुसावळ रेलसिटी प्रोजेक्ट चेअरमन चेतन पाटील, मुख्याध्यापिका कोमल कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.