पिंपरी-चिंचवड : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी उज्ज्वला जोशी यांची तर सचिवपदी पुष्पा पमनानी यांची निवड करण्यात आली. 2017-18 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली. नवीन अध्यक्षांचा पदग्रहण समारंभ डीजी अभय गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला. आकुर्डी येथील थरमॅक्स चौकात हा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी डीजी अभय गाडगीळ हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी माजी अध्यक्ष विजय तारक, सचिव गणेश जामगांवकर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सचिन पारेख, गजानन चिंचवडे, मारुती बहिरवाडे आदी उपस्थित होते.
विविध उपक्रम राबविण्याचा मानस
आतापर्यंत रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप, स्वच्छता मोहीम, साक्षर व समृद्द शहरासाठी जनजागृतीपर आर्थिक मदत, आरोग्य तपासणी व उपचार शिबिर, ई-लर्निंग किटचे वाटप आदी सामाजिक उपक्रम रोटरी क्लब, आकुर्डी राबवित आली आहे. त्याचप्रमाणे येणार्या वर्षात नदी सुधार प्रकल्प, टीचर्स ट्रेनिंग, हिमोग्लोबिन तपासणी, लिटरसी प्रोग्राम असे नाविन्यपूर्ण व विविध वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा मानस अध्यक्षा उज्ज्वला जोशी यांनी व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणी अशी
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षा उज्ज्वला जोशी, सचिव पुष्पा पमनानी, खजिनदार अभय खिवसरा, सामाजिक उपक्रम विभागप्रमुख रवी नामदे यांची तर गौतम शहा, प्रमिला जोशी, नीतेश मखवाना, ज्योस्त्ना चितपूरकर, राजीव खिवसरा, समीर देशपांडे, समीना शेख, जितेंद्र शर्मा यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तारक यांनी केले. सूत्रसंचालन आरती कुर्हा यांनी तर आभार गणेश जामगांवकर यांनी मानले.