नंदुरबार। येथील रोटरी क्लबतर्फे मोहनसिंग रघुवंशी विद्यालयात जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील मोहनसिंग रघुवंशी विद्यालय येथे 27 जुलै 2017 रोजी सकाळी 9 वाजता रोटरी क्लबन नंदुरबारतर्फे वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी हे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य यशवंत स्वर्गे, अनिल अग्रवाल, हिरालाल महाजन, युनुसभाई, रोटरीचे माजी अध्यक्ष जितेंद्र सोनार, नागसेन पेंढारकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, सेक्रेटरी पंकज पाठक, मोहनसिंग रघुवंशी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. रोटरी क्लबच्या उपक्रमाचे जिल्हाधिकार्यांनी कौतुक केले.