भुसावळ। दीपनगर विद्युत केंद्रात रोटरी क्लबच्यावतीने वसाहतीमधील रूग्णालयात आणि नवी क्रीडा संकुलामध्ये पोलिओ निर्मुलन अभियानाअंतर्गत एकूण 364 बालक यात 5 वर्ष आतील 358 आणि 5 वर्ष वरील 8 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. यासाठी कठोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरवाडे तर आशा सेविका वर्षा चव्हाण, सुरेखा पवार, सरला चौधरी आणि कल्पना पाटील यांनी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालकांना पोलिओ डोस दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी रोटरी अध्यक्ष प्रविण बुटे, सचिव आनंदगिर गोसावी, कोषाध्यक्ष मोहन सरदार, डॉ. प्रशांत जाधव, एम.डी. थेरोकार, राजू ताले, एल.एन. भंगाळे आदी उपस्थित होते.