नवीन कार्यकारीणी केली जाहीर
निगडीःरोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षपदी वैजयंती आचार्य यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून आदिती जोशी यांच्याकडे पदभार दिला. मावळते अध्यक्ष विलास गावडे यांनी वैजयंती आचार्य यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली. नवीन कार्यकरिणीमध्ये भालचंद्र शितोळे, पूनम पवार, बहार शहा, सुनील कुलकर्णी, बलवीर चावला, डॉ. महेश पाटील, संजय सिघांनी, कुलदीप मोकाशी, गॅवेन अँथोनी, अजित जक्कनवार, विलास गावडे यांचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डी.जी.इ रवी धोतरे उपस्थित होते. कार्यक्रमात क्लबच्या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
क्लबला मिळाली नवी उंची
रवी धोतरे म्हणाले की, गत वर्षीच्या कार्यकरणीतील सर्व सदस्यांनी चांगले काम केले. त्यामुळे क्लबला नवी उंची मिळाली आहे. नवीन कार्यकारणीमधील सर्व सदस्य देखील जोमाने काम करतील. ज्या समाजात आपण राहतो. त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो. याच उद्देशाने क्लबमधील प्रत्येक सदस्याने काम करायला हवे. विविध उदाहरणे देत आपापली क्षेत्रे निवडून कामाला लागण्याचा सल्ला देखील रवी धोतरे यांनी नवनिर्वाचितांना दिला. वैजयंती आचार्य म्हणाल्या की, शिक्षण, आर्थिक सधनता, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा आणि पर्यावरण याविषयी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. काही उपक्रमावर सध्या काम सुरू झाले आहे. नागरिकांच्या सहभागातून यशस्वी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे आभार बहार शहा यांनी मानले.